लोणावळ्यातील इंद्रायणी नदी पात्राची दुरावस्था नगरपरिषदेने दूर करून धार्मिक भावना जपाव्यात – राष्ट्रवादी कांग्रेस(शरद पवार)
लोणावळा :
लोणावळा नगरपरिषद,परिक्षेत्रात उगम पावलेली, थोर संतांची परंपरा लाभलेली अशी इंद्रायणी की ज्या इंद्रायणी नदीत कित्येक वर्षापासुन घरगुती गणपति,सार्वजनिक गणपतींचे विसर्जन केले जाते,याच पात्रालगत श्री हनुमान मंदिर आहे .येथेही धार्मिक पूजाअर्चा केली जाते,त्यामुळे येथे सांस्कृतिक परंपरा भक्ति भाव जपला जातो . आणि आज याच इंद्रायणी नदीची दुरावस्था झाली आहे .अस्वच्छता, दुर्गंधी,ने ती व्यापली आहे .परिसरातील मैलमिश्रित पाणी नदीपात्रात जमाहोऊन अशुद्ध पात्र झाले आहे .परंतु नगरपरिषदेंने पावसाळ्या पूर्वी फक्त वाढलेली जलपर्णी काढ़ली गाळ मात्र पात्राच्या कड़ेला लावला ही इंद्रायणी ची झालेली दुरावस्था दूर करुन नागरीकांच्याभावना जपाव्यात या साठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष(शरद पवार गट )लोनावला शहर यांनी लोनावळा नगरपरिषदेस निवेदन दिले आहे ते उपमुख्याधिकारी यांनी स्वीकारले आहे.लोणावळ्यातील या इंद्रायणी नदीसाठी आधुनिक विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून सदर चे मैलामिश्रित पाण्यावर प्रक्रिया करने शक्य आहे वितरण नलिका टाकून डोंगरगांव येथिल नगरपरिषदेच्या मैला शुद्धिकरण केंद्र येथे हे मैलामिश्रित पाणी संकलित करून प्रक्रिया करने शक्यआहे हे लोणावळा नगरपरिषदेने करावे. आणी स्वच्छतेबाबतचे दिशा निर्देश, असताना नगरपरिषद सदरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने करित नसल्याचे दिसून येत आहे हे सर्व निवेदनात राष्ट्रवादी कांग्रेस(शरद पवार )पक्ष यांनी नमुद केले आहे .
लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी,शरद कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले.या प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष नासिर शेख ,प्रांतिक सदस्य यशवंत पायगुडे,प्रदेश उपाध्यक्ष,विनोद होगले, तसेच राजु बोराटी,रमेश दळवी ,दत्तात्रय गोसावि,संतोष कचरे,नारायण जाधव,श्वेता वर्तक,नेहा पवार, प्रवीण करकेरा, अजिंक्य कुटे,सलीम मन्यार, आदिल शेख ई.कार्यकर्ते उपस्थित होते .
सदर कामास प्रथम प्राधान्य देवून काही महिन्यावर येत असलेल्या गणेशोत्सवापुर्विच या इंद्रायणी नदी पात्रात येणारे मैला मिश्रित पाणी नदी पात्रात येनार नाही या करिता ठोस उपाय योजना कराव्यात असे ही निवेदनात नमुद केले आहे .