पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून आरोपी अटकेत
वडगाव मावळ दि.23 (प्रतिनिधी) चारित्र्याच्या संशयावरूने पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला ही घटना शुक्रवारी (दि.23) सकाळी 6:55 वाजण्यापूर्वी कोंडिवडे आं मा ता.मावळ जि.पुणे हद्दीत घडला. आरोपी अटक सोनाबाई अशोक वाघमारे वय 33 वय रा. कोंडिवडे आं मा ता.मावळ खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.
अशोक बारकु वाघमारे वय 40 रा. परंदवडी ता.मावळ खून केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती अशोक वाघमारे हा त्याच्या सासरी कोंडिवडे आं मा येथे मयत पत्नी सोनाबाई वाघमारे हिच्या सोबत राहत होता. त्याला तीन मुलं आहेत. आरोपी पती अशोक वाघमारे त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. संशयावरून शुक्रवारी सकाळी 6:55 वा. वनक्षेत्राच्या ओढ्यावर दगडाने ठेचून खून केला. आरोपी स्वतः कामशेत पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.