नाट्य परिषद तळेगावचा महिला मंचाचा पहिला कार्यक्रम…….. डॉ. अपर्णा महाजन यांचे अभिवाचन संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे –

अखिल भारतीय नाट्य परिषद, तळेगाव शाखा, यांच्या अंतर्गत नव्याने सुरु झालेल्या नाट्य परिषद महिला मंचाचा पहिला कार्यक्रम मंगळवार २२ जुलै २०२५ या दिवशी संपन्न झाला.

चार्ली मॅकेसी या ब्रिटिश चित्रकार-लेखकाने लिहिलेल्या ‘A boy, a mole, a fox and a horse’ या चित्रकथेचे चित्रफितीच्या सहाय्याने डॉ. अपर्णा महाजन यांनी अभिवाचन केले.

या कार्यक्रमासाठी अ.भा.ना.प. तळेगाव शाखेचे अध्यक्ष श्री. सुरेश धोत्रे आणि संजय वाडेकर, नितीन शहा,विश्वास देशपांडे हे पदाधिकारी उपस्थित होते. त्याच बरोबर मोठ्या संख्येने तळेगावातील अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी रसिकही आले होते.

नाट्य परिषद महिला मंचातील कार्यकारिणी प्रमुख अपर्णा महाजन आणि सदस्य शर्मिला शहा, शुभांगी कारले, नयना डोळस आणि राधा गोहाड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Advertisement

महिला मंचाची संकल्पना सांगून दर महिन्याच्या दुस-या मंगळवार, दुपारी ४ ते ६ या वेळात कार्यक्रम होतील असे शर्मिला शहा यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. राधा गोहाड यांनी मंचासंबंधी निवेदन करून या एका चांगले उद्दिष्ट असलेल्या यागटाचे जास्तीत जास्त महिलांनी सदस्यत्व घेऊन त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. या प्रसंगी त्यांनी पुढील महिन्यात दुसऱ्या मंगळवारी डॉ. गीताली वि. मं यांचे व्याख्यान होणार असल्याचे सांगितले.

सादरीकरणा नंतर अनौपचारिक चर्चेत उपस्थितांनी ही कथा, आणि त्यातील जीवनमूल्ये आपल्या जगण्याशी किती निगडीत आहेत हे आवर्जून सांगितले.

नयना डोळस यांनी महिलांचे एक नाटक तसेच एक बालनाट्य त्या दिग्दर्शित करणार असल्याचे सांगून, स्वारस्य असलेल्या महिलांनी तसेच बालनाट्यात काम करू इच्छिणा-या मुलांनी त्यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आणि उपस्थितांचे आभार मानले. सूत्र संचालन श्री.विदुर महाजन यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page