तळेगाव दाभाडे (गाव) विभागातून शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी विशाल अशोकराव दाभाडे तर तळेगाव दाभाडे (स्टेशन ) विभागातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी अनिकेत अशोकराव भेगडे यांची नियुक्ती
तळेगाव दाभाडे –
तळेगाव दाभाडे (गाव) विभागातून शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (A) अध्यक्षपदी विशाल अशोकराव दाभाडे तसेच तळेगाव दाभाडे (स्टेशन ) विभागातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस (A) अध्यक्षपदी अनिकेत अशोकराव भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली. हे नियुक्तीचे पत्र मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे व शहराध्यक्ष सुरेश धोत्रे यांचे उपस्थिती मध्ये देण्यात आले.
Advertisement
विशाल दाभाडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत माजी नगरसेवक होते.तर जयभवानी तरुण मंडळ ट्रस्ट दाभाडे आळी चे विश्वस्त आहेत. तसेच अनिकेत अशोकराव भेगडे हे यशवंत नगर येथील शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष असून यशस्वी उद्योजक आहेत.या दोघाच्या निवडीचे पक्ष संघटनेतील तरुणाकडून स्वागत करण्यात येत आहे.






