तळेगाव येथील मंत्रा सिटी रोडवर अंधाराचे साम्राज्य कायम
तळेगाव दाभाडे:
वाढत्या वाहतुकीचा ताण कमी व्हावा. वाहतूक व प्रवासाला लागणारा वेळ कमी करण्यासाठी तळेगाव स्टेशन ते जुना पुणे मुंबई महामार्गाला जोडणारा रस्ता म्हणून मंत्रा सिटी रोडचे ओळख आहे. या रोडवर मंत्रा सिटी सारखे अनेक गृहप्रकल्प असून हा रस्ता वर्दळीच्या आहे या रस्त्यावर टेलिफोन एक्सचेंज ते तत्व हॉटेल या १०० मीटर परिसरात केवळ पथदिवे बसवलेले आहे. तत्व हॉटेल ते जुना पुणे मुंबई महामार्गापर्यंत या रस्त्यावर पथदिवेच नसल्यामुळे हा रस्ता संध्याकाळी अंधारात असतो. त्यामुळे पायी चालताना. वाहन चालविताना दुचाकी स्वार व महिलांना अंधाराचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्याने अनेक वाहने ही सुसाट वेगाने धावत असतात. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अंधारामुळे अपघात देखील झाले आहेत. संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष असून नागरिकांना तसेच वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. संबंधित विभागाने या रस्त्यावर तातडीने पथदिवे बसवावे अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे. या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य कायम असून नागरिकांची काळजी करणारा कोणी शिल्लक आहे का नाही अशी विचारणा या रस्त्यावरून जाणारे येणारे करत आहेत.






