तळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा, नेमबाज अनघा काळोखे हिला ट्रॅप शूटिंग मध्ये सुवर्णपदक

SHARE NOW

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथील नवोदित नेमबाज अनघा सचिन काळोखे हिने ट्रॅप शूटिंग मध्ये युवा महिला. जूनियर महिला आणि महिला अशा तीनही गटामध्ये सुवर्णपदक पटकावली व राज्य पातळीवर ट्रॅप शूटिंग गटातील नंबर १ शूटर ठरली. बालेवाडी येथे राज्यस्तरीय २८वी एस जे कॅप्टन एझिकले शूटिंग चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धा २६ते २८जुलै २०२५ दरम्यान शॉटगन शूटिंग रेंजमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ८० हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. डबल ट्रॅप मध्ये पारंगत असलेल्या अनघाने यंदा ट्रॅप शूटिंग गटात भाग घेत ही सुवर्णमय कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत अनघा हिने ५०पैकी ३६ गुण मिळवत तीनही गटामध्ये बाजी मारली. ती सध्या बालेवाडी येथे हेमंत बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. अनघाच्या या सुवर्णमय कामगिरीमुळे तळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तळेगाव व मावळ तालुक्यातील सर्व क्षेत्रातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page