लोणावळ्यात.महाविकास आघाडीचे “जोडे मारा आंदोलन “शिंदे भाजप सरकारचा जाहीर निषेध!.
लोणावळा :
सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी लोणावळ्यात छ. शिवाजी महाराज चौकात, महाविकास आघाडी लोणावळा शहर च्या वतीने, जोडे मारा आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मालवण येथील छ. शिवाजी महाराज यांच्या स्मारकात भ्रष्टाचार करणाऱ्या शिंदे भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.असे हे जोडे मारा आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी बॅनर वर असलेल्या मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमांना जोडे मारून घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी , लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष, श्री. नासिर शेख,, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहराध्यक्ष, बाळासाहेब फाटक,आशिष ठोंबरे, मच्छिन्द्र खराडे,श्वेता वर्तक,पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजु बोराटी, दत्ता गोसावी,काँग्रेस प्रदेश सचिव निखिल कवीश्वर,शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड,मा. नगराध्यक्षा उषाताई चौधरी पुष्पा भोकसे,, सुधीर शिर्के,नारायण आंबेकर, काँग्रेस सेवादल प्रदेश सचिव बाबुभाई शेख, जितेंद्र कल्याणजी सलीम मन्यार, भांगरे माणिक मराठे शिवदास पिल्ले महाविकास आघाडी चे सर्व आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.