कोंढव्यात विनयभंग, छेड़छाडीचा गुन्हा दाखल… आरोपी जुझर बद्री जसदेनवाला याला अटक.. समाजात फोटो, वीडियो प्रसारित करण्याची धमकी देऊन करत होता अत्याचार..
कोंढवा पुणे
काल कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल विनयभंग व छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी जुझर बद्री जसदेनवाला व्यवसाय – सुपर ए. सी. खरेदी, विक्री, दुरुस्ती रा. 588/ 2, ए कुतुबी मंजिल, मार्केट यार्ड,हाईड पार्कच्या शेजारी कोंढवा पुणे. गेल्या चार वर्षापासून आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका महिलेच्या संपर्कात आला. ऑक्टोबर 2021 पासून फोनवर बोलणे, मेसेज करणे अशा प्रकारच्या गोष्टी आरोपी सातत्याने करत होता, याकडे पीडित महिला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होती. ” तू मला भेटण्यासाठी माझ्या घरी ये नाहीतर मी तुझे अशील फोटो, व्हिडिओ सोशल मीडिया, नातेवाईक, सर्वांकडे देईल” अशा प्रकारच्या धमक्या सदरील महिलेला फोनवर देऊन पीडित महिलेला घरी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. जर तू ही घटना कोणाला सांगितली तर पाठीमागील सर्व व्हिडिओ फोटो व आजचे सुद्धा फोटो व्हिडिओ मी सर्व समाजात प्रसारित करीन व तुझ्या आयुष्याची वाट लावील अशा प्रकारच्या धमक्या देऊन सदर पीडित महिलेवर आरोपीने स्वतःच्या राहत्या घरी अतिप्रसंग केला.
सदर पीडित महिलेने घडलेली सर्व घटना आपल्या पतीला व नातेवाईकांना सांगितली. त्यानुसार पीडित महिलेने कोंढवा पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार कलम 74, कलम 64 (2) (m)
351(1) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कोंडवा पोलीस स्टेशन चे पोलीस करत आहे.