वयाच्या १७ व्या वर्षी मिळवली डॉक्टरेट ! तळेगाव दाभाडेतील डॉ. वैष्णव शैलेश काकडेचा प्रेरणादायी प्रवास

पिंपरी, प्रतिनिधी :

अगदी कमी वयात मोठा नावलौकिक मिळवलेली अनेक उदाहरणे आपण पाहतो. असाच एक विक्रम तळेगाव दाभाडे येथील विक्रम डॉ. वैष्णव शैलेश काकडे याने केला आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी शैलेश काकडे याने भौतिकशास्त्रात केनेडी युनिव्हर्सिटी, सेंट लूसिया विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट (भौतिकशास्त्र) पदवी मिळवून नावलौकिक मिळवला आहे.

डॉ. वैष्णव काकडे याने भौतिकशास्त्रातील क्वांटम रिलॅटिव्हिटी कॉन्सेप्ट्स (QRC) यावर केलेल्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्याबद्दल युनिव्हर्सल रेकॉर्ड्स फोरमने डॉ. काकडे यांना ‘वर्ल्ड्स यंगेस्ट अस्पायरिंग फिजिसिस्ट,’ तर नासाने ‘गॅलॅक्टिक प्रॉब्लेम सॉल्व्हर’ म्हणून गौरविले आहे. परंतु इतक्यावरच न थांबता, डॉ. वैष्णव यांनी ‘अॅस्ट्रोब्रेन’ या संस्थेची स्थापना करून अंतराळविज्ञान आणि विज्ञान शिक्षणाला सामाजिकत्वाशी जोडले आहे.

Advertisement

त्यांच्या या यशाबद्दल भारत गौरवरत्न श्री सन्मान, आणि रतन टाटा नॅशनल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड २०२५ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. वैष्णव काकडे यांच्या या अविश्वसनीय यशामागे त्यांच्या अथक परिश्रमांइतकीच त्यांच्या कुटुंबाची भूमिका देखील महत्वाची आहे. विशेषतः आई वडीलांच्या प्रोत्साहनामुळेच डॉ. वैष्णव काकडे यांनी उत्तुंग झेप घेतली आहे.

विज्ञान, अध्यात्म आणि समाजकार्य यांचा एकत्रित संगम साधत त्यांनी अनेक तरुणांच्या मनात स्वप्नांची ज्योत प्रज्वलित केली आहे. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि कुटुंबाचे सहकार्य एकत्र आले, तर वय हा यशाचा सर्वात छोटा घटक ठरतो. हे वयामध्ये न अडकता जग बदलण्याचे बळ देणारे डॉ. वैष्णव काकडे यांचे उदाहरण सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page