इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभा संपन्न.
तळेगाव दाभाडे :
बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी ,इंद्रायणी महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व तंत्र शिक्षण विभागातर्फे प्रथम सत्रातील पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह मा.चंद्रकांतजी शेटे सर ,प्राचार्य डॉक्टर मलघे सर, उपप्राचार्य एस .पी. भोसले सर, पर्यवेक्षिका प्रा. यू.एस .दिसले मॅडम , वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.व्ही.व्ही.भेगडे मॅडम ,कला विभाग प्रमुख प्रा. के. डी जाधव सर, तंत्र शिक्षण विभाग प्रमुख प्रा. एन .टी .भोसले सर विज्ञान विभाग प्रमुख प्रा.खाडप सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.एम. जगताप सर यांनी केले .
महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. पी .भोसले सर यांनी आपल्या प्रास्ताविक पर केलेल्या भाषणामध्ये महाविद्यालयाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न कशाप्रकारे केला जातो. विविध स्पर्धा, क्रीडा, वक्तृत्व इत्यादी द्वारे विद्यार्थी कसा घडवला जातो ,विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील सुरक्षितता याची थोडक्यात माहिती पालकांना दिली.
संपूर्ण शिक्षकांच्या वतीने पर्यवेक्षिका दिसले मॅडम यांनी खूप सहज सोप्या भाषेत विचार मांडून अभ्यासक्रम इतर उपक्रम शिस्त याबाबत पालकांशी संवाद साधत पालकांना बोलते करण्याचा प्रयत्न केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मलघे सर यांनी पालकांशी संवाद साधत विद्यार्थी आपल्या सर्वांसाठीच कसा महत्त्वाचा आहे, व त्या दृष्टीने विद्यार्थी येथे घडवला जातो. हा आश्वासक शब्द पालकांना दिला. संस्थेचे कार्यवाह चंद्रकांतजी शेटे साहेब अध्यक्षीय भाषणात शिक्षणाबरोबरच शिस्त आणि सुरक्षितता याची महाविद्यालय काळजी घेतेच ,परंतु पालकांनीही यामध्ये साथ देण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष मा.रामदासजी काकडे सर यांनी विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सोयी – सुविधा दिल्या जातील. व सर्वांगीण विकासाबरोबरच व्यक्ती म्हणून विद्यार्थी कसा घडवला जातो. याचे विश्लेषण करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी दामिनी पथकातील सुनंदा जाधव यांनी पालकांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी करून देत प्रत्येक पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये शिक्षकांबरोबरच पालकांचा सहभाग ही महत्त्वाचा असतो हे या पालक सभेचे औचित्य होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विषय शिक्षक, वर्गशिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.