लोणावळा ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन उपविभाग लोणावळा आयोजित श्री. गणेशोत्सव 2024.नियोजित व आढावा बैठक संपन्न.
लोणावळा : लोणावळ्यात हॉटेल चंद्रलोक येथे लोणावळा ग्रामीण व शहर पोलीस उपविभागीय लोणावळा विभाग आयोजित गणेशोत्सव 2024 चे नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस उपविभागीय सहा. पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग श्री. सत्य साई कार्तिक यांनी मार्गदर्शन केले.बैठकीत ग्रामीण व शहरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, ग्रामीण परिसरातील नागरिक पोलीस पाटील शहरातील पत्रकार नागरिकांनी गणेशोत्सव मंडप, साऊंड डिसिबल. लाईट, मंडप परवाने, इलेक्ट्रिक परवाने. विसर्जन मिरवणूक कमानी अडथळे, इ विषयांवर प्रश्नावली केली नियमावली वर चर्चा झाली संबंधित एम.एस.ई. बी., नगरपरिषद, ची कामे. इ वर चर्चा झाली यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. वाहतूक, सिसिटीव्ही, वायरिंग तपासणी इ वर समाधानकारक चर्चा झाली.या प्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्री. नासिर शेख, बाळासाहेब पायगुडे, विनोद होगले, मावळ वार्ता चे संजय अडसुळे, सुन्नी मुस्लिम जमात शफी शेख, आर.पी. आय. गणेश गायकवाड, विजय जाधव पोलीस पाटील जाधव ,महिलांमध्ये, आर पी आय च्या यमुना साळवे, शिवसेना (ऊ बा ठा) शादान चौधरी,पदाधिकारी पोलीस पाटील डोंगरगाव सौ. कचरे मॅडम,विविध संस्था चे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी लोणावळा शहर सर्व पत्रकार उपस्थित होते.विसर्जन मिरवणूकीतील अडथळे व मिरवणूक लवकर कशी नेता येईल यावर प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात असे मत पत्रकार संघांचे अध्यक्ष श्री. विशाल पाडाळे यांनी व्यक्त केले. पत्रकार adv. संजय पाटील, विशाल पाडाळे, विशाल विकारी,बंडू येवले, सुनिल म्हस्के,संतोषी तोंडे, गुरुनाथ नेमाणे, सागर शिंदे, इ. उपस्थित होते.सूत्रसंचालन बापूलाल तारे यांनी केले तर आभार सौ. धोत्रे मॅडम ग्रामीण पोलीस अधिकारी यांनी केले.