*पुणे जिल्हा पत्रकार संघाची देवाची आळंदी येथे महत्वपूर्ण बैठक*
पुणे :
मराठी पत्रकार परिषद, मुंबई संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघाची मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत एमआयटी इंजिनियरिंग कॉलेज, देहू फाटा ,आळंदी देवाची ,ता. हवेली,जि. पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
ह्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहेत.सदर बैठकीसाठी मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी ,परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष , सचिव व कार्यकारणी पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी यांनीही या बैठकीसाठी उपस्थित राहायचे आहे. बैठक बरोबर वेळेत सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.