इंद्रायणी महाविद्यालयाला 19 वर्षाखालील शालेय तालुकास्तरीय मुलांच्या हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद
तळेगाव दाभाडे:
गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी बालविकास विद्यालय तळेगाव दाभाडे या ठिकाणी पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांच्या संघाने चांगल्या रीतीने कामगिरी करून उपविजेतेपद पटकावले.
सर्व खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा शिक्षिका प्रा. प्रतिभा गाडेकर मॅडम, श्री गोरख काकडे श्री अश्फाक मुलानी यांनी केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास आप्पा काकडे, संस्थेचे कार्यवाह श्री चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे तसेच उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले.