*वैष्णवी हगवने आत्महत्या प्रकरणी नीलेश चव्हाण सहआरोपी*

SHARE NOW

पिंपरी :

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता नीलेश रामचंद्र चव्हाण (रा. कोथरूड, पुणे) यालाही सहआरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर ठरवण्यात आले असून, बाल न्याय (मुलांचे संरक्षण व काळजी) कायद्यानुसार अतिरिक्त कलमे लावण्यात आली आहेत. नीलेश चव्हाण फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

वैष्णवी शशांक हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केल्यानंतर १७ मे रोजी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ८०(२), १०८, ११५(२), ३५२, ३५१(२), ११८(१), ३(५) अंतर्गत कारवाई झाली. ही तक्रार हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांवर आधारित होती.

दरम्यान, मृत वैष्णवी हिचा दहा महिन्यांचा मुलगा काही काळ नीलेश चव्हाण याच्या ताब्यात होता. याकाळात बाळाची योग्य काळजी घेतली गेली नाही, असा आरोप कस्पटे कुटुंबियांनी केला. त्यानुसार बाल न्याय कायद्याच्या कलम ७५ आणि ८७ नुसार गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

 

*प्रकरणाची पार्श्वभूमी…*

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूनबाई वैष्णवी हिने भुकूम (ता. मुळशी) येथील सासरी १६ मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागे हुंड्यासाठी छळ व घरगुती हिंसाचाराची कारणे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वैष्णवीने शशांक हगवणे याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्यूनर कार व इतर महागड्या वस्तू तिच्या माहेरून देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही तिला पुन्हा पैशांची मागणी करत घराबाहेर काढल्याचं तक्रारीत नमूद आहे. तिच्या वडिलांनी बावधन पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, वैष्णवीवर मानसिक व शारीरिक छळ झाला होता.

*पाचही आरोपी पोलिस कोठडीत*

या प्रकरणात सुरुवातीला शशांक, त्याची आई व बहिणीला अटक करण्यात आली. नंतर फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे व दीरालाही अटक करण्यात आली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page