नूतन अभियांत्रिकी मध्ये पार पडला विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा
तळेगाव दाभाडे :
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकीमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अभिनंदन समारंभ नुकताच पार पडला. या समारंभास ला. शांतामाणेक पवना आर्टस्, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज पवनानगर, हा.भ.प आनंदराव काशिद ज्युनिअर कॉलेज इंदोरी, श्री. लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज कार्ला, श्री. छत्रपती शिवाजी कॉमर्स ज्युनिअर कॉलेज कान्हे, नवीन समर्थ विद्यालय टेक्नीकल सायन्स ज्युनिअर कॉलेज तळेगाव दाभाडे, या तसेच तळेगाव परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे डॉ. रोहन मुळे आणि डॉ. रुचु कुथियाला उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. सपली, प्रथम वर्ष शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. शेखर रहाणे, सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी दशेत शिक्षण घेत असताना आपण त्या संधीचे सोने करण्याचा प्रयन्त केला पाहिजे त्यातूनच स्वतःचे करिअर घडेल असे डॉ. रोहन मुळे बोलताना म्हणाले. पोषण म्हणजे काय, आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे कशी पुरवली जातात. योग्य पोषण मिळाल्यास आपल्या शरीराची वाढ कशी होते अशा अनेक मुद्दयांवर आरोग्याची काळजी कशी घेतली गेली पाहिजे याची माहिती डॉ. रुचु कुथियाला यांनी दिली
प्राचार्य डॉ. एस. एन. सापली यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक व करियर संधींविषयी मार्गदर्शन केले. प्रा. शंकरराव उगले यांनी महाविद्यालयीन प्रवेशांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली, तर प्रा. सागर देशपांडे यांनी स्वायत्त संस्थांच्या महत्त्व आणि त्याचे फायदे विद्यार्थ्यांना स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेखर रहाणे यांनी केले. सुत्रसंचालन मनीषा गोंधळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शितल जडे यांनी केला. डॉ. मिलिंद ओव्हाळ यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. शाहूराज साबळे आणि संतोष शेळके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले