आळंदीत गणेश जयंती निमित्त देशमुख महाराज यांचे कीर्तन उत्साहात गणेश याग, महाआरती, महाप्रसाद, मिरवणूक
आळंदी : आळंदी येथील विविध श्री गणेश मंदिरांसह लक्षशांती श्री गणेश मंदिरात श्री गणेश जयंती निमित्त राष्टीय युवा कीर्तनकार समाज प्रबोधनकार ह .भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सुश्राव्य कीर्तन हरिनाम गजरात झाले. हजारो भाविकांनी कीर्तन सोहळ्यात श्रवण सुखाची अनुभूती घेतली. या सोहळ्याचे आयोजन लक्षशांती श्री गणेश मंदिराचे प्रमुख युवा उद्योजक सचिन येळवंडे यांनी केले होते.
येथील शांताई पार्क वडगाव रस्त्यावरील लक्षशांती श्री गणेश मंदिरात श्री गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यात सकाळी श्रीना अभिषेख, अथर्वशीर्ष पठण, श्री गणेश याग, श्रींची महाआरती, महाप्रसाद वाटप उत्साहात झाले. यावेळी हरेश तापकीर, शांताबाई येळवंडे, लक्ष्मण येळवंडे, युवा उद्योजक सचिन येळवंडे, सागर येळवंडे, संतोष येळवंडे, संतोष कलाटे, शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास कदम, उदय काळे, किरण कोल्हे आदी उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन समस्त शांताई पार्क रहिवासी, मित्र परिवार, सुपर बझार परिवार, दत्तकृपा डेव्हलपर्स येळवंडे परिवार, आळंदी चऱ्होली खुर्द ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले होते.
येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील पुरातन श्री गणेश मंदिर, शिवतेज गणेश मंदिर, अखिल भाजी मंडई मंडळ गणेश मंदिर, ज्ञानराज मित्र मंडळ गणेश मंदिर, राजे शिवछत्रपती गणेश मंदिर, टेमगिरे गणेश मंदिर, जय गणेश मंदिर, दत्तनगर श्री गणेश मंदिर आदी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. गणेश भक्तांनी श्रींचे मंदिरात दर्शनास गर्दी करून दर्शन घेतले.