परभणी सेलूत मराठी पत्रकार परिषद – सेलू तालुका पत्रकार संघा तर्फे भव्य राज्यस्तरीय पत्रकार मेळावा उत्साहात
आळंदी : परभणी सेलूत मराठी पत्रकार परिषद – सेलू तालुका पत्रकार संघा तर्फे भव्य राज्यस्तरीय पत्रकार मेळावा उत्साहात साजरा झाला. यावेळी रंग अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ अकोले पत्रकार संघास व संतराव काळे आदर्श पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड पत्रकार संघास पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, राज्याचे विश्वस्त शरद पाबळे, विश्वस्त किरण नाईक, राज्याचे अध्यक्ष मिलिंद आष्टीकर, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर आदींसह राज्यातील सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रातील सर्व तालुका, जिल्ह्यांचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन झाले. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत पत्रकारांचे प्रश्नासाठी वेळ प्रसंगी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा खणखणीत इशारा राज्य शासनास दिला. राज्यातून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.