रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल देहू येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
देहू :

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल देहू येथे १० जुलै रोजी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व वंदन करून करण्यात आली. शाळेतल्या विद्यार्थिनींनी मधुर आवाजातील प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात केली. या वेळी शाळेच्या शिक्षिका धवणे मॅडम, जयश्री जाधव, माधवी अहिरराव, अलका मॅडम,सारिका शिंदे, आनंद सुतार सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने गुरूंवर केलेली कविता सर्वांसमोर सादर केली त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून गुरूंचे महत्व सांगितले.

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरु हा त्याची आई असते. त्यानंतर विविध गुरु त्याच्या आयुष्यात येतात. शिक्षकांच्या आणि पालकांनी केलेल्या संस्कारांमुळे विद्यार्थी घडत असतो. विद्यार्थ्याच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितकाच शिक्षकांचा देखील असतो. असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रिडाशिक्षक अमित घेनंद सर या कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला शाळेतील शिक्षिका रोकडे मॅडम,आशा चव्हाण, देवकन्या चव्हाण,पूजा जाधव, प्रतिभा जाधव,अश्विनी दोलताडे, शोभा खरात, पूनम मोरे, धनगर मॅडम व इतर सर्वच शिक्षिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका पूनम मॅडम यांनी सर्वांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार मानले व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका चव्हाण मॅडम यांनी केले आणि या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…






