अमोल एजिंग फिटनेस आणि तुळजाई फौंडेशनच्यावतीने गहुंजेत नेत्र तपासणी शिबिर
पिंपरी (प्रतिनिधी ) :
अमोल एजिंग फिटनेस क्लब आणि तुळजाई फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गहुंजे येथिल
अड्रेस वन सोसायटीत (फेज ५ आणि ६) च्या क्लब हाऊस मध्ये रविवार १८ मे २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा सर्व वयोगटातील ११० नागरिकांनी लाभ घेतला.
पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस आणि तुळजाई फौंडेशन चे अध्यक्ष शिवाजी घोडे या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तरस यांनी लोकांना निरोगी जीवनशैलीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले, तर घोडे यांनी लोकांना मोबाईल आणि लॅपटॉपचा जास्त स्क्रीन टाइम टाळण्यास सांगितले.हा स्क्रीन टाइम वाढल्याने डोळ्याचे विकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
डिलिजंट नर्सिंग ट्रस्ट चे डॉ. उपाध्याय आणि डॉ. उमेश कांबळे यांनी डोळ्यांची तपासणी केली.
यावेळी दहावीत उत्तीर्ण झालेल्या सेल्वराज स्वामी, सुहानी गिरी, अदिती कदम आणि श्रावणी कोथिंबिरे या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अड्रेस वन सोसायटीचे (फेज ५ आणि ६) समिती सदस्य सतीश कुलकर्णी, दत्तात्रय लोणीकर, दत्ता सांगळे, सचिन शिरसागर आणि मंगेश खोडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. तर अमोल एजिंग फिटनेस चे अविनाश शिरसाट, अजय म्हस्के, भरत कणसे, अन्नपूर्णा कॅटरिंग च्या संचालिका स्मिता कांबळे विशेष परिश्रम घेतले.
अमोल एजिंग फिटनेसचे संचालक अमोल मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर मंगेश खोडे यांनी आभार मानले.