निरंतन शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा आत्मसात केली पाहिजे : केंद्रीय मंत्री रामदास आठवले सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळी येथील नवीन इमारतीचे रामदास आठवले यांच्या हस्ते उदघाट्न
पुणे, प्रतिनिधी :
सावित्रीबाई फुले महाविद्यालयाची चांगली इमारत पाहून छान वाटले. एम.डी. शेवाळे यांची उणीव भासत आहे. भविष्यात हा वटवृक्ष आणखी मोठा व्हावा, ही अपेक्षा आहे.
निरंतन शिक्षण यशस्वी व्हायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.
डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळी येथील नवीन इमारतीचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते परशुराम वाडेकर, सीमाताई आठवले, डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी. टी. रजपूत, जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, संस्थेच्या संचालिका काजलताई शेवाळे, प्राचार्य डॉ. नरेशकुमार शिशुपाल, पद्मावती प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका वर्षाताई पाटील, महात्मा फुले मुलींची शाळा नाना पेठच्या मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले, निवृत्ती बांदल, माजी सरपंच स्नेहल दगडे, पुरुषोत्तमदास पहुजा, जयवंतीताई पहुजा, आलोक जोशी, रीना जोशी, डॉ. नरेश पोटे, पिसोळी ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले, की सावित्रीबाई फुले महाविद्यालयाची चांगली इमारत पाहून छान वाटले. एम.डी. शेवाळे यांची उणीव भासत आहे. भविष्यात हा वटवृक्ष आणखी मोठा व्हावा, ही अपेक्षा आहे. विठ्ठल रामजी शिंदे हे चळवळींशी नाते जोडलेले थोर समाजसुधारक होते. अस्पृश्य वर्गाची शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी नाना पेठेत अहिल्याश्रम सुरू केले. त्यातून या मुलांना शिक्षण दिले. आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी आपले सैनिक सज्ज आहेत. आधुनिक युगात शिक्षणासाठीही लढाई करणे गरजेचे बनले आहे. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आई-वडील, गावाचे नाव मोठे करावे.
प्रास्ताविक करताना संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे म्हणाले, आजच्या शिक्षणातील मूळ पाळेमुळे शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारसरणीत मिळतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे यांचे शैक्षणिक योगदान नव्या पिढीला प्रोत्साहन ठरत आहे. संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली.
सूत्रसंचालन सुनीता भोसरेकर यांनी, तर आभार सोनाली फाले यांनी मानले.