*किवळे येथे अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; देहूरोड पोलिसांकडून पुढील तपास सुरू*

SHARE NOW

देहूरोड :

किवळे येथील एक्सप्रेस वे महामार्गाच्या एक्झिटजवळील पुलाखाली रस्त्याच्या कडेला शनिवार (ता.१५) दुपारच्या सुमारास एका अंदाजे ३५ वर्षीय अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ही बाब गुन्हेगारीचा संशय निर्माण करणारी असल्याने पोलिसांनी तपास अधिक गतीने सुरू केला आहे.

 

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या अंगावर पिवळ्या रंगाचा कुर्ता, लाल सलवार, नाकात नकली नथ, तसेच मृतदेहाजवल काळ्या रंगाच्या चप्पला आढळल्या आहेत. महिलेच्या जवळ ओळख पटेल अशी कोणतीही कागदपत्रे किंवा साहित्य सापडलेले नाही.

Advertisement

 

मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी संबंधित अहवालाची प्रतीक्षा आहे. प्राथमिक तपासात कोणतीही निश्चित माहिती मिळाली नसल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू ठेवत सर्व शक्यता पडताळून पुढील तपास सुरू केला आहे.

 

या प्रकरणासंबंधी मृत महिलेची ओळख किंवा घटनेविषयी कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास त्वरित देहूरोड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page