उपसरपंचपदी दादाभाऊ सुदाम केदारी यांची बिनविरोध निवड
चांदखेड :

मौजे ग्रामपंचायत चांदखेड उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली चांदखेड ग्रामपंचायतच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ मीना दत्तात्रय माळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत अधिकारी एस एच इनामदार यांनी कामकाज पाहिले. उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी माजी उपसरपंच सागर दिलीप गायकवाड माजी उपसरपंच प्रमोद बबन गायकवाड माजी उपसरपंच वृषाली उमेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य पूजा कांबळे सागर कांबळे व विद्यमान उपसरपंच प्रियांका ओंकार गायकवाड उपस्थित होते सौ प्रियांका ओमकार गायकवाड यांचा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच यांच्याकडे दिला होता रिक्त झालेल्या जागेवरती श्री दादाभाऊ सुदाम केदारी यांची सरनामते एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखणे कामे शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेख साहेब व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले . पवन मावळ मंडळाचे अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ज्ञानोबा माळी सोमाटणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री राजू शेठ मोरे खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाबूलाल गराडे उद्योजक दीपक संभाजी गायकवाड माजी चेअरमन नथूभाऊ गायकवाड शिवाजीनगर दत्तात्रय आगळे संदीप आगळे युवा नेते नवनाथ गायकवाड व चंदनवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते






