लोणावळा नगरपरिषद सेवक वर्गाची सहकारी पतसंस्था मर्यादित लोणावळा 66 व्या वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा संपन्न
लोणावळा :
शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी 66 व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषद सेवक वर्गाचे सहकारी पतसंस्था मर्यादित लोणावळा क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. नगर परिषदेच्या पुरंदरे क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यांमध्ये नगर परिषदेच्या सेवक वर्गाने मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. रोहन गायकवाड व त्यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक हर्षल धुळे आणि त्यांच्या संघाने पटकावला. हर्षल धुळे यांच्या टीम मध्ये श्रीकांत कंधारे, अभय लोंढे, बबलु रिले, निसार शेख, सुनील जाधव, संदीप लांडगे, यशवंत वाघमारे यांनी चांगली कामगिरी करत संघाला द्वितीय क्रमांक मिळवून दिला लोणावळा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड हे या संघाचे संघमालक होते.
तृतीय क्रमांक भरत गायकवाड आणि सूर्यकांत हळुनदे यांच्या संघाला विभागून देण्यात आला.