चपळगाव हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
अक्कलकोट
ग्रामीण विद्या विकास विद्यालय चापळगाव या शाळेमध्ये 1984 85 या वर्षात इयत्ता 10 वी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी 40 वर्षानंतर एकत्रित येऊन गेट-टुगेदर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमास संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रविकांत पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक कुमारप्पा पाटील, हिरेमठ सर, पटेल सर, कवदे सर, कोरे सर, शेख सर, सुतार सर व आकतनाळ मॅडम उपस्थित होते.
सुरुवातीला संस्थेचे संस्थापक कै. पी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिवंगत माजी विद्यार्थी व गुरुवर्य शिक्षक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी गेल्या चाळीस वर्षांपूर्वी शाळेत असताना घडलेले प्रसंग व आलेले अनुभव कथन केले. यावेळी गुरुवर्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांना एकत्रित पाहून आमचे आयुष्य आणखीन वाढल्याचे मत व्यक्त केले. खूप वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्रित आल्यामुळे त्यांच्यातील प्रेमभाव, जिव्हाळा, आत्मीयता वृध्दींगत झाल्याचे दिसून आले. आज अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर अधिकारी म्हणून काम करत आहेत त्यांची झालेली प्रगती पाहून अभिमान वाटत असल्याचे अध्यक्ष रविकांत पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमास माजी विद्यार्थी विश्वनाथ काळे, रत्नकांत बऱ्हाणपुरे, रविकांत जंगले, मलकप्पा भरमशेट्टी, मौलाली नदाफ, लिंगप्पा नेरके, संगप्पा कल्याणशेट्टी, धनाजी मोरे, बसवराज बन्ने, नरसिंग जगताप, चंद्रकांत चटमुटगे, भरत पवार, तिप्पण्णा चिंचोली, अंबादास डांगे, दयानंद मोरे, विद्वान गजधाने, सिद्धू नारायणकर, विठ्ठल उकरंडे, अहमद फुलारी, शिवाजी सुतार, सुरेश सुरवसे, मल्लिकार्जुन शिंदे, उमेश बुगडे, तानाजी मोरे, बिभीषण बिराजदार, तानाजी मोरे, विठोबा पांढरे, विजयकुमार बटगेरी, बसवराज सुलगडले, अशोक सुतार, रेवणसिद्ध बन्ने, पांडुरंग मोरे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचलन माजी विद्यार्थी जमादार यांनी केले तर सर्वांचे आभार पांडुरंग मोरे यांनी मानले.