आळंदीतील अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था ४८ तासांत बंद करा – रुपाली चाकणकर महीला आयोगाच्या अध्यक्षा यांची आळंदीत बैठक
आळंदी : येथील तीर्थक्षेत्र आळंदीत अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था वाढल्या असून या वारकरी शिक्षण संस्थांत अलीकडे बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे देखील वाढत असून आळंदीचे नाव बदनाम होत असल्याने आळंदी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत महिला आयोगाने आळंदी पोलीस स्टेशन मध्ये तातडीने बैठक घेतली. या बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सर्व संबंधित घटकांशी संवाद साधूंन येत्या ४८ तासांत सर्व अनधिकृत संस्था तात्काळ बंद करून तसा अहवाल आयोगास सादर करण्याचे आदेश दिले.
आळंदी पोलीस स्टेशन मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी भेट देऊन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रशासनास कारवाईचा खणखणीत इशारा देत बैठक घेत माध्यमांशी देखील संवाद साधला.
यावेळी खेडचे प्रांत अनिल दौन्डे, तहसीलदार ज्योती कदम, परिमंडळ तीन चे सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले, माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णाताई काळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पानसरे, आळंदी ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.
आळंदीत बाल लैंगिक अत्याचार वाढल्याने आळंदी ग्रामस्थानी महिला आयोगासह इतर प्रशासकीय ठिकाणी निवेदन देऊन लक्ष वेधले. याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तात्काळ आळंदीस भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेत सुसंवाद साधला. अशा घटना आणि अशा संस्था यांना पाठीशी घालणार नसल्याचे सांगत आळंदीत झालेल्या घटनांचा आढावा माहिती घेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा आळंदीत जोपासली जाते. येथे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देत संबंधित सर्व संस्था बंद करण्याचे सूचना केल्या. अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था तातडीने बंद करण्याची मागणी देखील आळंदी ग्रामस्थांनी यावेळी केली. त्या म्हणाल्या येत्या ४८ तासात सर्व अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर कारवाई करुन बंद करण्याचे आदेश त्यांनी यावेळी पोलिसांना दिले. यात शासकीय हहिकरी यांनी कारवाईत कसूर केल्यास संबंधीतावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. संबंधित प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल असे महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
यापूर्वी घडलेल्या घटनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. आळंदीत अनेक संस्था धर्मादाय आयुक्त व महिला व बालकल्याण विभागा कडून कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत सुरु आहेत. आळंदीत वारकरी शिक्षणा समवेत शालेय शिक्षणाचे नावाखाली उत्पन्न मिळवण्याचे साधन म्हंणून सुरु झालेल्या सर्व अनधिकृत संस्था बंद करून अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. पुढील सात दिवसां नियमावली तयार करून नियमावली प्रमाणे, नियमानुसार कार्य व्हावे. यासाठी सूचना देत स दिवसांनी पुन्हा या संदर्भात सूचना, निर्देश देण्यात येतील असे सांगितले. वारकरी शिक्षण संस्था चालकांवर धर्मादाय कार्यालय , महिला बाळ कल्याण आयुक्तालय यांचे नियंत्रण नसल्याने हे प्रकार आळंदीत वाढल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले. संबंधित संस्थामध्ये जागा, सोयी सुविधा मुळान्चे संख्येचे प्रमाणात मिळत नसल्याने केवळ नोंदणी आहे म्हंणून संस्था सुरु रहाणार नाहीत. त्यांना महिला व बाळ कल्याण आयुक्तालयाचे नियम देखील पाळणे आवश्यक आहे. यावेळी महीला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वारकरी संस्थांना व शाळांना भेट दिली. अनाधिकृत संस्थांवर पोलिसांनी पथकाने तत्पर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
यावेळी आळंदी महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णाताई काळे यांनी महिला बचत गटाचे वतीने राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा सत्कार केला . यावेळी आळंदी ग्रामस्थांचे वतीने माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील यांनी सत्कार केला. यावेळी आळंदी येथील धर्मशाळा, मंगल कार्यालय, लग्न, वाहतूक कोंडी अशा विषयावर देखील चर्चा झाली.