*इंद्रायणी फार्मसी महाविद्यालयात “दिक्षारंभ २०२५” संमेलनाचे आयोजन*
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित कृष्णराव भेगडे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालयात दिक्षारंभ २०२५ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी दिली. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या च्या विश्वस्थ सौ.निरूपा कानिटकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती तसेच त्यांनी इंद्रायणी विद्या मंदिराचा यशाचा वाढता आलेख याविषयीं माहिती सर्व विद्यार्थ्यांना अवगत करून दिली. याप्रसंगी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रडो प्रा. लि. चे कार्यकारी अधिकारी डॉ. प्रल्हाद वांगीकर यांचे मार्गदर्शन केले . या कार्यक्रमासाठी जमलेल्या आणि उत्सुक सर्व विद्यार्थ्यांना पाहता आम्हालाही आमच्या कॉलेज च्या दिवसांची आठवण झाली असेही अध्यक्ष यांनी नमूद केले.महाविद्यालयातील फार्मसी विभागप्रमुख प्रा. गुलाब शिंदे यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रम आणि फार्मसी क्षेत्रातील आपले योगदान याविषयीं माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . गणेश म्हस्के यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिक्षारंभ २०२५ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वेदिका चोरगे व कु. पायल घोटारणे यांनी केले.तर आभारप्रदर्शन प्रा. श्रद्धा सातकर यांनी मानले. सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी व शिस्तबद्ध आयोजनासाठी डॉ. योगेश झांबरे, प्रा. महेश गावडे, प्रा. विक्रांती कोळी आणि प्रा. मृणाली काळे यांच्या सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
इंद्रायणी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रामदास काकडे, कार्यवाह मा.श्री. चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष मा.श्री. शैलेश शहा, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी. फार्मसीचे विभागप्रमुख प्रा. जी. एस. शिंदे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.