वाळंज विद्यालयाच्या बाळासाहेब खेडकर यांना शिक्षक सेनेचा शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्कार
आंबवणे :- महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात पुणे येथे आदर्श शिक्षक आमदार, आदर्श शाळा, मुख्याध्यापक,शिक्षक, विषय शिक्षक, कर्मचारी असे 125 पुरस्कार महाराष्ट्र शिक्षक सेना (उ बा ठा) आयोजित पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास
मा. ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक आमदार कोकण विभाग…..
मा. बाळासाहेब शिवरकर मा.राज्यमंत्री
मा. महेंद्र गनपुले..सर. शिक्षण तज्ञ
मा. सुनीलभाऊ जगताप. अद्यक्ष शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र.
मा. हरिचंद्र गायकवाड मुख्य संयोजक.
मा. प्रसाद गायकवाड अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ.
मा. शिवाजी कामठे. उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सोहळा संपन्न होऊन पुरस्कार वितरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजीमहाराज प्रतिमेचे पूजन केले. आदर्श शिक्षक आमदार म्हणून मा. श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांना गौरविले. मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील उपक्रमशील सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे येथील शिक्षक श्री बाळासाहेब खेडकर यांना महाराष्ट्र शिक्षक सेना सुनीलभाऊ जगताप अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र यांच्या कल्पनेतून आयोजित कार्यक्रमात शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्कार प्राप्त झाला.
म्हात्रे साहेब व शिवरकर या
मान्यवरानी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मा हरिचंद्र गायकवाड यांनी केले.
कोकण चे शिक्षक आमदार मा.श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. या प्रसंगी मुख्याध्यापक भटू देवरे, शिक्षक राहुल आवळे, ज्योती खेडकर उपस्थित होते.
बाळासाहेब खेडकर यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थापक अध्यक्ष, नंदकुमार वाळंज, शाळा समिती, मुख्याध्यापक, शिक्षक मित्र परिवार नातेवाईक यांच्या वतीने खेडकर सरांचे अभिनंदन होत आहे.






