वडगाव शहरात गणेशोत्सवा पुरता मर्यादित नसून सार्वजनिक मिरवणुकांना डीजे बंदी

SHARE NOW

वडगाव मावळ: गणेशोत्सव काळातील डीजेचा वापर आरोग्यास हानिकारक ठरत असेल तर गणेश उत्सवा निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीतही तो हानिकारकच असेल असे सांगून आरोग्यास हानिकारक असलेल्या डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवा पुरता मर्यादित नसून तो सगळ्याच प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुकांना लागू आहे. असे वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले आहे. तसेच गणेश उत्सव मंडळाने इतर खर्च टाळून गावात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केले आहे. पोटोबा देवस्थानचे किरण भिलारे यांनी सांगितले की डीजे बंदी घालण्यात येणाऱ्या निर्णयावर पोटोबा देवस्थान. जय बजरंग तालीम मंडळ व आमच्या सोबत असणारे मंडळ या सर्व निर्णयांचे पालन करतील. भाजपा नेते भास्करराव म्हाळसकर यांनी डीजे बंदी असलेल्या निर्णयानुसार सर्व गणेश मंडळांनी याचे पालन करणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले आहे. मंगेश काका ढोरे यांनी सांगितले की वडगाव शहरात जर डीजे बंदी घालण्यात आली नाही तर मी स्वतः उपोषणाला बसेल असा इशारा दिला आहे. यावेळी वडगाव पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीला पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे. विश्वस्त भास्करराव म्हाळसकर. सुभाषराव जाधव. तुकाराम ढोरे. अनंता कुडे. सुनिता कुडे. गुलाबराव म्हाळसकर. मंगेश काका ढोरे. संभाजी म्हाळसकर. विशाल वहिले. अतुल राऊत. उमेश ढोरे. कल्पेश भोंडवे. सोमनाथ धोंगडे. पत्रकार सुदेश गिरमे. बाळासाहेब वाघमारे. संजय दंडेल. सतीश गाडे तसेच वडगाव शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page