उर्से गावात कृषि दिनानिमित्त कृषीकन्यांद्वारे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन-

SHARE NOW

उर्से –

मौजे उर्से येथे कृषि विभाग व डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी त्याच्या संयुक्त विद्यमाने रावी कार्यक्रमाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत कृषी दिनानिमित उर्से गावात भात, सोयाबीन बीजप्रक्रिया व कृषि उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रमास कृषिकन्या अमृता चांडोले, एकता ढवळे, श्रुती कोपनर, जान्हवी कुपेकर, अनोघा मेश्राम, असदा मुल्ला, नवीनचंद्र बोराडे,उपकृषी अधिकारी, वडगाव, विकास गोसावी,उपकृषी अधिकारी, काळे कॉलनी, श्रीम. प्रमिला भोसले, सहाय्यक कृषी अधिकारी उर्से , सरपंच भारती गावडे, प्रगतशील शेतकरी जालिंदर धामणकर, सुभाष धामणकर, भारत ठाकूर, पोलीस पाटील गुलाब आंबेकर , बाळासाहेब कारके, चेअरमन मधुकर सावंत व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

मार्गदर्शन करताना नवीन बोराडे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक व सेंद्रिय बीजप्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. थायरम, ट्रायकोडर्मा, गोमूत्र, तसेच चारसूत्री, एस. आर. टी ,अभिनव पद्धत लागवड या बाबत मार्गदर्शन केले. प्रमिला भोसले यांनी कृषि विभागच्या योजना बाबत मार्गदर्शन केले शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी येथील उपप्राचार्य व समन्वयक डॉ. एस. एन. पाटील आणि मार्गदर्शक सौ. व्ही. बी. घोलप तसेच महाविद्यालयातील मार्गदर्शक प्राध्यापक आर. बी. शिद व वैशाली दरंदले, उर्से ग्रामपंचायतीचे सरपंच,पदाधिकारी आणि शेतकरी तसेच ग्रामस्थ या उपक्रमासाठी उपस्थित होते.

हा उपक्रम “कृषिदिन” निमित्त राबवण्यात आला असून, यामधून शेतकऱ्यांमध्ये सुधारित शेती पद्धतीबाबत जनजागृती झाली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page