रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टसाइडचा स्थापना समारंभ उत्साहात संपन्न

SHARE NOW

पुणे:

२७ जून २०२५रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टसाइड चा २०२५–२६ या वर्षासाठीचा स्थापना समारंभ पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लब येथे उत्साही वातावरणात पार पडला.

डॉ. गौरी जोशी यांनी क्लबच्या नवीन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. मावळत्या अध्यक्षा रोटेरियन डिंपल धोत्रे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले व डिंपल धोत्रे यांनी २४-२५ सालाचे पुरस्कार जाहीर केले.

या सोहळ्याला रोटरी डिस्ट्रिक्टचे मान्यवर पदाधिकारी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी रोटेरियन नितीन ढमाले, एजी रोटेरियन वैशाली वेर्नेकर, पीडीजी रोटे रवी धोत्रे, पीडीजी रोटे प्रमोद जेजुरीकर, जिएसआर पापा कुरे आणि इतर अनेक मान्यवर रोटेरियन विवेक दीक्षित, किरण इंगळे, राजेंद्रकुमार सराफ इ. उपस्थित होते.

या सोहळ्यात ७ नवीन सदस्यांचे क्लबमध्ये स्वागत करण्यात आले, ज्यामुळे क्लबची ताकद अधिक बळकट झाली आहे.

डॉ. जोशी यांचे उत्स्फूर्त व सकारात्मक अध्यक्षीय भाषण सर्वांना भावले व त्यांनी आपल्या भाषणात “Breathe Green, Live Pink” हा वर्षाचा संकल्प मांडला — पर्यावरणस्नेही आणि आध्यात्मिक आणि स्वस्थ जीवनशैलीचा पुरस्कार करणारा.

क्लबच्या ठळक आगामी उपक्रमांची माहितीही या वेळी जाहीर करण्यात आली:

Advertisement

Rotary Eco Utsav – पर्यावरणपूरक जीवनशैलीचा उत्सव

Rotary Spiritual Festival – अध्यात्म आणि भावनिक संतुलनासाठी विशेष उत्सव

‘आकांक्षा’ – १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सहायक डिस्ट्रिक्ट उपक्रमामधे सहभाग

मेगा वृक्षारोपण मोहीम सहभाग

रक्तदान शिबिर

इतर क्लब्ससोबत सिनर्जी उपक्रम

या वर्षी क्लबने नेट झिरो क्लब म्हणून प्रमाणपत्र मिळवले आहे. हे सन्मानपत्र जिल्हा पर्यावरण संचालक डॉ. रामजेन्द्रकुमार सराफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे:

सचिव: रोटे दिनेश कुलकर्णी

कोषाध्यक्ष: रोटे नीरजा गाडगीळ

क्लब प्रशासन डिरेक्टर: रोटे डॉ. संतोष किर्लोस्कर

सेवा प्रकल्प डिरेक्टर: रोटे आनंद इनामदार

नेक्स्ट जनरेशन डिरेक्टर: रोटे अजित जोशी

रोटरी फाउंडेशन डिरेक्टर : रोटे संजीव तुळपुळे

IT डिरेक्टर : रोटे विश्र्वजित धोत्रे

क्लब लर्निंग फॅसिलिटेटर डिरेक्टर: रोटे मीना राव

सदस्यता डिरेक्टर: रोटे वंदना गर्गटे

व्यवसायिक प्राविण्य डिरेक्टर: अश्विनी कुलकर्णी

पुनर्निर्वाचित अध्यक्ष (PE): रोटे ईशान राव

जनसंपर्क (PI) डिरेक्टर: रोटे डॉ. गौरी जोशी

रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टसाइड हा सेवाभावी, आधुनिक विचारसरणीचा आणि पर्यावरणपूरक आणि स्वस्थ समाज उभारणी उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणारा क्लब आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page