तळेगावात देशी बनावटीची ५ पिस्तुले व २० जिवंत काडतुसे जप्त. तीन सराईत गुन्हेगारांना अटक
तळेगाव दाभाडे:
पिंपरी चिंचवड व परिसरात देशी बनावटीचे ५ पिस्तूल व २० जिवंत काडतुसे तस्करी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून पाच देशी बनावटीचे पिस्तूल व वीस जिवंत काडतुसे सह ८लाख ७६हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे= उमेश चंद्रकांत केदारी(वय२८.रा पुनावळे ता मुळशी) मंथन उर्फ गुड्डू अशोक सातकर (वय २८.रा कान्हे. ता मावळ) विशाल ज्योतीराम खानेकर(वय ३०.रा. मोहिते वाडी ता मावळ) हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून उमेश केदारी याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न सह एकूण तीन गुन्हे दाखल आहे. विशाल खानेकर याच्याविरुद्ध शारीरिक दुखापत सह एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. मंथन सातकर याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह एकूण तीन गुन्हे दाखल आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ग्रस्त घालत असताना मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे पोलीस शिपाई गणेश सावंत. सुमित देवकर. विनोद वीर. यांना माहिती मिळाली की तीन सराईत गुन्हेगार तळेगाव दाभाडे परिसरात फिरत आहेत. तसेच त्यांच्या कारला नंबर प्लेट नसून ते पिस्तूल विक्रीसाठी आले आहेत. त्यानुसार पथकाने मारुती सुझुकी सियाज कारमधून फिरणाऱ्या तिघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पाच पिस्तुले व वीस जिवंत काडतुसे मिळाली व दोन मोकळ्या मॅक्झिन. तीन मोबाईल फोन. व मारुती सुझुकी सियाज कार असा ८लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही पिस्तुले विक्रीसाठी तसेच दहशत माजमवण्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ. पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी. पोलीस अंमलदार सोमनाथ मोरे. गणेश सावंत. सुमित देवकर. विनोद वीर. हर्षद कदम. गणेश हिंगे. या पथकाने ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना पाच पिस्तुले व वीस जिवंत काडतुसे सह अटक केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.