नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माजी राज्यमंत्री बाळ भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांनी घेतली भेट
तळेगाव दाभाडे: माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मावळ विधानसभा क्षेत्रातील श्रीक्षेत्र देहू. तळेगाव दाभाडे. व वडगावच्या विकास कामाच्या संदर्भात नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची शुक्रवार दिनांक ३०मे २०२५ रोजी पुण्यात सदिच्छा भेट घेतली. या भेटीत श्रीक्षेत्र देहू. वडगाव नगरपंचायत व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील प्रलंबित व नाविन्यपूर्ण कामासंबंधी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व शिष्टमंडळाने नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याशी विविध कामावर सविस्तर चर्चा केली. माधुरी मिसाळ यांनी संबंधित विभागांना विकास कामासंदर्भात योग्य त्या सूचना देण्यात येतील असे सांगितले. त्यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे. माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दादासाहेब सातव. तळेगाव दाभाडे.इंदोरी मंडलाचे भाजपा अध्यक्ष चिराग खांडगे. श्रीक्षेत्र देहू. देहूरोड मंडलाचे भाजपा अध्यक्ष रघुवीर शेलार. वडगाव शहर भाजपा अध्यक्ष संभाजी म्हाळसकर. मावळ तालुका भाजपा अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड. देहूचे नगरसेवक प्रवीण काळोखे. संतोष हगवणे. वडगाव चे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त किरण भिलारे. उपस्थित होते.