*तळेगाव येथील खेळाडूंचे यश*
तळेगाव दाभाडे :
नुकत्याच पतियळा पंजाब येथे १६ते २१ जुन रोजी झालेल्या राष्ट्रीय सबजुनियर व ज्युनियर ईक्युप पाॕवरलिफ्टिंग स्पर्धा पंजाब पाॕवरलिफ्टिंग असोशियन व पाॕवरलिफ्टिंग इंडीया यांच्या मान्यतेने राष्ट्रीय पाॕवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी जिमच्या खेळाडुंनी यश मिळविले.

कु. सई अमोल शिंदे हिने ५७ कीलोगट सबजुनियर २९७.५ कीलो वजन उचलुन कास्य पदक पटकावले .कु सेजल विश्वनाथ मोईकर हिने ७६किलो गट ज्युनियर ४४७.५ किलो वजन उचलुन कास्य पदक मिळविले या दोघी इंद्रायणी जिम तळेगाव येथे छत्रपती पुरस्कार विजेते नितीन वसंत म्हाळस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असतात. इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष रामदास काकडे,
कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डाॕ. संभाजी मलघे यांनी त्यांचे कौतुक केले.






