खून करणाऱ्या तीघांना जन्मठेपेची शिक्षा,वडगाव मावळ सत्र न्यायालयाचा निर्णय
वडगाव मावळ :
वडगाव मावळ न्यायालय येथे माननीय डी.के.अनभुले साहेब अतिरिक्त सत्र न्यायाधीश -१ ,सेशन कोर्ट वडगाव मावळ यांच्या कोर्टामध्ये देहूरोड पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर क्रमांक 43/2016 मध्ये आरोपी नामे 1) प्रमोद उर्फ बंटी दिलीप जाधव , 2) अक्षय उर्फ प्रकाश भाऊसाहेब ओव्हाळ ,3) बाबू उर्फ रंणजीत रमेश दळवी यांना कलम *302*,143,147,148,149 अन्वये *जन्मठेपेची* शिक्षा सुनावण्यात आली.
आरोपी नामे प्रमोद उर्फ बंटी दिली जाधव यांने मयत मोसिन मोबीन शेख यास दारू पिणे करिता सोबत घेऊन जाऊन तू आमच्या सोबत सतत का वाद घालतो या कारणावरून त्यास दारू पाजून त्याच्यासोबत भांडण करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला व त्यास इतर दोघांनी देखील मदत केली व मयताचा मोबाईल व पाकिटातील पैसे घेऊन तेथुन पळून गेले सरकारतर्फे सदर खटल्यामध्ये अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांनी काम केले. सरकारी अभियोक्ता स्मिता चौगुले यांनी माननीय न्यायालयात सदर खटल्यामध्ये मुख्यत्वे करून वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे याच्यासह साक्षीदारांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर करून खटला शाबित करणे कामी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्याकरिता त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले व सरकारतर्फे भक्कमपणे बाजू मांडली.
माननीय न्यायालयाने सदर अभियोग पक्षाचे साक्षी पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी जन्मठेप कारावासाची शिक्षा ठोठावली.
सहाय्यक पोलीस आयुक्त देहुरोड कोपनर सो., देहूरोड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे सो, तत्कालीन तपासी अधिकारी वपोनि. वाघमारे सो., यांच्या मार्गदर्शनानुसार कोर्ट पोलीस अमलदार तोंडे (तात्कालीन),कोर्ट अमलदार आशा घाटे देहूरोड पोलीस स्टेशन यांनी सदर खटल्यामध्ये वडगाव मावळ न्यायालय मध्ये पाठपुरावा केला होता.