मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार श्री. श्रीरंग अप्पा बारणे यांची सलग तिसऱ्यांदा मावळ लोकसभेच्या खासदार पदी प्रचंड मतानी निवड झाल्याबद्दल खासदार साहेबांचा महायुती लोणावळा शहराच्यावतीने “भव्य नागरी सत्कार”
लोणावळा :
गुरुवार दिनांक 20 जुन रोजी मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार श्री. श्रीरंग अप्पा बारणे यांची सलग तिसऱ्यांदा मावळ लोकसभेच्या खासदार पदी प्रचंड मतानी निवड झाल्याबद्दल खासदार साहेबांचा महायुती लोणावळा शहराच्या वतीने “भव्य नागरी सत्कार” करण्यात आला.
याप्रसंगी ,महायुति घटक पक्षाचे सर्व,पदाधिकारी, आर पी आय (आठवले) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,सूर्यकांत वाघमारे मनसे शहर प्रमुख भरत चिकने,राष्ट्रवादी शहराध्यक्ष विलास बडेकर,भाजपा चे शहराध्यक्ष,अरुण लाड, आणि घटक पक्षाचे पदाधिकारी,महिला , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित सत्कार मूर्ति खासदार श्रीरंग अप्पा बारणे ,सूर्यकांत वाघमारे (पश्चिम,महाराष्ट्र आर पी आय अध्यक्ष),सुरेखा जाधव (मा. नगराध्यक्ष, लो.न, प.) श्रीधर पुजारी (मा,उपनग्राध्यक्ष, लो न,प,) भाजपा शहराध्यक्ष,अरुण लाड,
मनसे शहराध्यक्ष भारत चिकने,राष्ट्रवादी,शहराध्यक्ष, विलास बड़ेकर, आर पी आय तालुकाध्यक्ष,लक्ष्मण भालेराव,शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर,, उपतालुका प्रमुख शरद हुलावळे , भरत हरपुडे,शहरतील विविध क्षेत्रातील पदाधिकारी,मारवाड़ी समाज महिला पदाधिकारी, ई. बहुसंख्येने उपस्थित होते.प्रसंगी खासदारानी मतदारांचे आभार मानले व येणारी विधानसभा आणि उर्वरित विकासकामे पूर्ण केली जातील.लोकसभा निवडणूक मतदारांनी दिलेल्या सहकार्याचे आभार मानले.
सूर्यकांत वाघमारे यांनी शासकीय अधिकार्यांच्या अडमूठे धोरणाचा आलेख देताना व्यक्त केले की,अधिकारी, लोकाना वेळ देत नाही . लोणावळ्यात
होत असलेल्या विकास कामाची माहिती घेण्यासाठी ती नागरिकांपर्यंत पर्यंत पोहचण्यासाठी आढावा बैठकीची आवश्यकता आहे . त्यांनी आढावा बैठकीची मागणी केली. छ.शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण बाबत अद्याप काहीच काम नाही भूमिपूजन झाले पण काम अद्याप सुरू नाही याबाबात
लोणावळ्यातील विकास कामाचा बोजवारा ऊडाला असल्याचे सांगत नगरपालिका अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली, पूढ़े म्हणाले, बारणेंना कमी लीड मिळण्याच्या कारणास जबाबदार आहेत शासकीय अधिकारी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार लोणावळा शिवसेना शहराध्यक्ष,संजय भोईर यांनी केले.