तळेगाव येथे कानाच्या शस्त्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न:

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

 

तळेगाव दाभाडे येथील माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण कान, नाक व घसा आणि शरीररचनाशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक ०१ आणि ०२ ऑगस्ट २०२५ रोजी “टेम्पोरल बोन डिसेक्शन” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील ४९ हुन अधिक तज्ज्ञ डॉक्टरांनी या कॅडेव्हेरिक डिसेक्शन द्वारे प्रशिक्षण घेतले, अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ सुचित्रा नागरे यांनी दिली.

Advertisement

या वेळी कार्यशाळेचे संचालक डॉ. संतोष माने, डॉ. देवदत्त कोटणीस, डॉ. शशांक वेदपाठक, डॉ. संतोषकुमार राजमणी, डॉ. विवेक निर्मळे, डॉ. पूनम खैरनार, डॉ. कोमलिका रॉय, डॉ. अनिकेत लाठी, विनोद शिंदे, डॉ. परमानंद चव्हाण, डॉ. सायली गोरेगावकर, डॉ. अश्विनी भेले, डॉ निवेदिता नारायणकर यांनी प्रशिक्षण दिले.

पदव्युत्तर विद्यार्थी आणि इंटर्न डॉक्टर यांनीही या कार्यशाळेमध्ये आपला सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास, प्राचार्या डॉ. संध्या कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ. तुषार खाचणे यांनी नियोजकांचे कौतुक केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page