*कृष्णराव भेगडे बी. फार्मसी व डी. फार्मसी महाविद्यालयात “अश्वमेध २०२४” पारितोषिक वितरण, माजी विद्यार्थी मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष*

तळेगाव दाभाडे :

इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित कृष्णराव भेगडे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी. फार्मसी) व इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी (डी. फार्मसी )महाविद्यालयात अश्वमेध २०२४ वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते अशी माहिती बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे व डी. फार्मसी महाविद्यालायचे प्राचार्य श्री. गुलाब शिंदे यांनी दिली. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे व विश्वस्थ सौ.निरूपा कानिटकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांनसोबत संवाद साधावा अशी अपेक्षा सौ. कानिटकर मॅडम यांनी भाषणातून व्यक्त केली.आपल्या अध्यक्षीय भाषणात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन आणि बंधन गरजेचे असल्याचे श्री. चंद्रकांत शेटे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गणेश म्हस्के यांनी केले.श्री. निशिकांत गायकवाड व मानसी देवकर यांनी माजी विद्यार्थी प्रतिनिधी मनोगत व्यक्त केले. यावेळी शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी, विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमतील विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Advertisement

दि. २१/०२/२०२४ ते २३/०२/२०२४ यामधे विविध खेळांचे आयोजन केले होते. त्यामध्ये क्रिकेट, कब्बडी, थ्रोबॉल, डोज बॉल, व्हॉलीबॉल, कॅरम आणि चेस चा समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे क्रीडा सचिव मा. श्री. गोरख काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. आशपाक मुलाणी आणि प्रा. तेजस्विनी कोठावळे यांनी केले. त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून रोहित सोनवणे(स्पोर्ट्स सेक्रेटरी), प्रवीण पालवे (जनरल सेक्रेटरी) , गौरव देवकर यांनी उत्तम कामगिरी पार पाडली.

या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात फार्मसी चे आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अश्वमेध २०२४ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. युगंधरा कंगराळकर व कु. वेदिका चोरगे यांनी केले.तर आभार प्रा.राहुल जाधव यांनी मानले.

सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी व शिस्तबद्ध आयोजनासाठी डॉ. योगेश झांबरे व प्रा. कादंबरी घाटपांडे, प्रा. मृणाली काळे यांच्या सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रामदास काकडे, कार्यवाह मा.श्री. चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष मा.श्री. शैलेश शहा, आणि मा श्री संदीप काकडे इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page