तनवीर मोहम्मद सय्यद यांची निवड… रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी पदी निवड..
कोंढवा पुणे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी तनवीर मोहम्मद सय्यद यांची निवड करण्यात आली.
तन्वीर सय्यद यांचे सामाजिक कार्य व संघटन कौशल्य या गुणांच्या आधारे त्यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड केल्याचे मुस्ताक बाबा शेख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी यांनी सांगितले.
यावेळी माननीय खाजाभाई शेख महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक आघाडी तसेच माननीय सय्यद हबीब यासीन अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा अल्पसंख्याक आघाडी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहर कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या प्रसंगी त्यांची निवड करण्यात आली त्यांच्या परिसरातील सर्व नागरिकांनी व मित्रपरिवारांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना तन्वीर सय्यद यांनी सांगितले की या पदाचा वापर सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी करण्यात येणार असून पक्ष वाढीसाठी, संघटनेसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.






