श्री. विशाल लोखंडे यांच्याकडून भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन
तळेगाव दाभाडे :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री. विशाल लोखंडे यांच्या संकल्पनेतून व उद्योजक रणजित काकडे व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या सहकार्याने भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार असून तळेगावकरांमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण आहे.
स्पर्धेत विजेत्यांसाठी विशेष बक्षिसांची सोय करण्यात आली आहे. त्यात महापैठणी, मानाची पैठणी, सोन्याची नथ, चांदीचे झुमके यांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक सहभागीला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा उद्देश सणासुदीच्या काळात महिलांनी दाखविलेली कलात्मकता आणि सृजनशीलता (Creativity) याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. सहभागी होण्यासाठी आधारकार्ड, लाईट बिल, राहत्या घराचा पत्ता पुरावा व फोटो आवश्यक आहे.
याशिवाय मोफत शासकीय योजनांची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये आयुष्मान भारत कार्ड, मतदान कार्ड, ई-श्रम कार्ड, किसान कार्ड, पुणे महानगरपालिका स्मार्ट कार्ड आदींचा समावेश आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आयोजकांशी ८९५६७४०८३७ / ७३८७१६८५१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






