टाकवे पुलाला संरक्षण कठडे लावणार कधी?

SHARE NOW

टाकवे : आंदर मावळातील टाकवे बुद्रुक एमआयडीसी व चाळीस गावे वाडी वस्ती यांना जोडणारा महत्त्वाचा इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाला संरक्षण कठडे लावण्यात आलेले नाहीत. या नवीन पुलावरून वाहनांची सतत वर्दळ असल्याने संरक्षण कठड्याच्या अभावी अपघात होण्याची शक्यता बळकावली आहे. या पुला च्या दोन्ही बाजूने चढ-उतार व वळणदार रस्ता आहे. वळण रस्त्यावर व पुलावर संरक्षण भिंत/जाळी अद्याप लावलेली नाही .हा नवीन पुल आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शासनाने पूर्ण केला आहे मात्र चुकीच्या नियोजनामुळे आजवर या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. तरी टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाला संरक्षण कठडे अथवा जाळी त्वरित बसवावी अशा आशयाचे निवेदन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायणराव ठाकर. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष काळूराम मालपोटे. टाकवे बुद्रुकचे माजी सरपंच तुकाराम असवले. किसान सेलचे अध्यक्ष दिगंबर आगिवले. कल्हाटचे सरपंच शिवाजी करवंदे.कोडिवडे आमा च्या सरपंच राधाबाई मुंढारकर. भोईरे चे सरपंच बळीराम भोईरकर आदी ने दिले आहे. पुला च्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे बांधून देणे नियमानुसार बंधनकारक असते असे असताना देखील ते बांधण्यात आलेले नाही तरी देखील संबंधित ठेकेदाराला कोणी बिल पास केले असा सवाल अनेक नागरिक उपस्थित करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कार्यवाही करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page