तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभाग आंतर शालेय स्नेहसंमेलन 2024 -25 मोठ्या उत्साहात संपन्न

तळेगाव दाभाडे :

मंगळवार दि 21/0 1 /2025 रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभाग आयोजित आंतरशालेय स्नेहसंमेलन’ गर्जा महाराष्ट्र’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी  विजयकुमार सरनाईक यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे विद्यमान आमदार  सुनिल आण्णा शेळके, माजी नगराध्यक्ष  रविंद्र दाभाडे, नगरपरिषदेचे भांडार प्रमुख  सिद्धेश्वर महाजन ,रोटरी क्लब अध्यक्ष  विलास शहा, सतर्क महाराष्ट्र या न्यूज चॅनलची संपादक रेखा भेगडे, विलास भेगडे  , गणेश बोरुडे, अमीन खान,रेश्मा फडतरे  इनरव्हील क्लब अध्यक्षा  संध्या थोरात, इंद्रायणी उद्योग समूह प्रमुख  संदीप शेळके ,उद्योजक  संजय बाविस्कर,  दीपक हुलावळे, प्रशासन अधिकारी  शिल्पा रोडगे , सर्व शाळांचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्भोसले, जगताप  सर्व शाळांचे शिक्षक विद्यार्थी व पालक सदर कार्यक्रमास उपस्थित होते. सकाळ सत्रात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले .

नगरपरिषदेच्या सर्व सात शाळांनी योगासने व मानवी मनोरे यांची अतिशय सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. शाळांच्या उल्लेखनीय बाबींचा प्रास्ताविकातून  सांगळे सरांनी उल्लेख केला .तदनंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  अर्शती विजयकुमार सरनाईक हिचा रायफल शूटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्षांच्या हस्ते गर्जा महाराष्ट्र हस्तलिखिताचे अनावरण करण्यात आले. ‘चांगले खेळाडू चांगले कलावंत स्नेहसंमेलनातून घडतात ,’अशा भावना रवींद्र दाभाडे   यांनी व्यक्त केल्या.

Advertisement

विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच योग साधनेला व व्यायामाला सुरुवात करा असे  विजय शहा यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये यश मिळवल्याबद्दल बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. मावळचे विद्यमान आमदार  सुनील शेळके यांनी शाळांच्या भौतिक सुविधांबाबत बदल घडवून आणण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्या हस्ते रांगोळी व कलादालनाचे उद्घाटन करण्यात आले. दुपार सत्रातील सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक प्रा. शा. क्र.३ च्या विद्यार्थ्यांच्या ‘शिवराज्याभिषेक सोहळा ‘या नृत्य सादरीकरणाने झाली. वीर जिजामाता कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी शिववंदना गायली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासन अधिकारी श्रीम. रोडगे मॅडम होत्या. या कार्यक्रमास तळेगावचे पोलीस अधिकारी विशाल पाटील ,दामिनी पथकातील  जाधव,  शिदोरे व  कंद मॅडम उपस्थित होत्या. माजी शिक्षण मंडळ सभापती  बिजेंद्र किल्लावाला व  शंकर भेगडे, नृत्य विशारद  उर्मिला भोंडवे ,योगशिक्षिका मनीषा भेगडे ,मावळ पंचायत समिती विस्तार अधिकारी  शोभा वहिले, विस्तार अधिकारी  निर्मला काळे सर्व शिक्षा अभियान स्टाफ मधील  भोई,  शेळके,  कुंडले, लावरे,  कोकाटे वक्तृत्व स्पर्धा परीक्षा  जांभुळकर सर व  ठुले सर या कार्यक्रमास उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .नंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. गर्जा महाराष्ट्र या अंतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध सण व उत्सव नृत्य प्रकार यावर आधारित बहारदार नृत्ये सादर करण्यात आली आणि उपस्थितांची वाहवा मिळवली. सौ.भोंडवे व सौ भेगडे यांनी नृत्याचे परीक्षण केले. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती मावळच्या विस्तार अधिकारी  वहिले मॅडम यांनी गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांचे विशेष कौतुक केले तसेच ‘अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी छंद जोपासावा,जो आयुष्यात खरा आनंद देतो’.असे बहुमोल मार्गदर्शन प्रमुख पाहुण्या सौ. भोंडवे यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. प्रशासन अधिकारी श्रीम.रोडगे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे पालकांचे व कार्यालयीन सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. नगर परिषदेचे कायम सकारात्मक सहकार्य लाभते तसेच पालकांनी सुद्धा सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले .सकाळ सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संशितोळे व सौ उंडे यांनी केले. दुपार सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. मुलाणी व सौ. ठाकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीम. गाडे व श्री मुळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page