तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक कर्मचा-यांचे मानधन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबना, रखडलेले मानधन मिळावे यासाठी दिले लेखी निवेदन.
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक विद्यालय नं.२ आणि नं.६ येथील कर्मचाऱ्यांचे मानधन मे२४ पासून डिसेंबर २४पर्यंत मिळाले नाही.यापुर्वीही सदर कर्मचाऱ्यांनी आपले कार्यालयात संपर्क साधला असून मुख्याध्यापकांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे.तरीही मानधन न मिळाल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची अर्थिक कुचंबना होत असुन त्यांना श्री गणेश उत्सव,दसरा,दिवाळी आदी सणही साजरे करता आले नाहीत.कर्मचा-यांची अर्थिक परिस्थिती हलाखिची झालेली आहे.तातडीने मानधन मिळाले नाही तर सदर कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ येणार आहे आणि यापुढे मानधन दरमहा वेळच्यावेळी देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन संबंधित कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२४) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले असुन ते निवेदन उपमुख्याधिकारी यांनी स्वीकारले आहे.प्रांतांची सही झाली नसल्यामुळे सदर मानधन देता आले नाही असे यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले.सदर निवेदनाची प्रत मावळचे विद्यमान आमदार यांनाही देण्यात आलेली आहे.
चौकट-तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक शाळा नं.२आणि नं.६चे कर्मचारी मे २४पासून डिसेंबर २४ पर्यंतचे मानधन न मिळाल्यामुळे उसनवारी करीत आहेत आता उसनवारीही बंद झाली आहे.तरी संबंधितांनी तातडीने दखल घ्यावी.
अरुण माने,माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता.