कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूल चा शालेय क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे :
शुक्रवार दिनांक. 24 जानेवारी 2025 रोजी कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय पातळीवर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे संस्थापक मा.श्री.चंद्रकांत काकडे अध्यक्ष श्री.संदीप काकडे, खजिनदार सौ.गौरी काकडे, संचालिका सौ. सोनल काकडे, संचालिका सौ. सुप्रिया काकडे, मुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत, पर्यवेक्षिका सौ. शुभांगी वनारे, पर्यवेक्षिका सौ. कीर्ती कुलकर्णी उपस्थित होत्या या कार्यक्रमानिमित्त नर्सरी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.त्यामध्ये लिंबू चमचा, विठोबा जंप, फ्रॉग जंप, गेट रेडी फॉर स्कूल,कोन कलेक्शन,धावणे,कबड्डी, खो-खो,दोरी उड्या ,बास्केटबॉल ,कॅरम बुद्धिबळ,मॅरेथॉन , लांब उडी यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते.या स्पर्धांमध्ये नर्सरी विभागातील 53,तर प्राथमिक व माध्यमिक विभागातील 252 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे देखील कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमानिमित्त उपस्थित संस्थेच्या संचालिका सौ.सोनल काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, खेळामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणे आवश्यक असते कारण त्यातून हरणे आणि जिंकणे हे देखील समजते सर्व विजयी विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले व सहभागी विद्यार्थ्यांना यापुढेही असेच प्रयत्न करत रहा व उज्वल यश संपादन करा असे सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत यांनी विद्यार्थ्यांना खेळाबद्दल मार्गदर्शन केले. सर्व विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सहभागी विद्यार्थ्यांना पुढील विविध स्पर्धांसाठी प्रोत्साहन दिले.पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे शालेय सहशिक्षिका सौ.नीता मगर व कु.श्रुती साळवे यांनी सांगितली.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.निता मगर व आभार सौ.ज्योती नवले यांनी मानले.