*सुदुंबरे येथे तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न*
मावळ :
जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आयोजित केलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 9/9/2024 ते 10/9/2024 या कालावधीत सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल सुदुंबरे येथे स्पर्धेचे आयोजन केले होते. 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये श्री राम विद्यालय, नवलाख उंबरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला व तसेच मुलांनी तृतीय क्रमांक मिळविला कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष सिद्धांत यादव, संचालिका याशिका यादव, राजेश जाधव, प्राचार्य सुप्रिया साळुंखे यांच्या हस्ते झाले. विजेते संघांचे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, शालेय समिती अध्यक्ष युवराज काकडे विद्यालयाचे मुख्याध्यापाक व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.तसेच मॅजिक बस इंडिया फौंडेशन ( Mondelez ) यांनी विजेत्या संघास शुभेच्छा दिल्या.