शिंदेशाही पगडी चंदनउटी दर्शनास भाविकांची आळंदी मंदिरात गर्दी श्रीचे राजबिंडे वैभवी रूप श्रीराम जन्मोत्सव दिनी रामाची पालखी ग्राम प्रदक्षिणा

SHARE NOW

आळंदी ( प्रतिनिधी ) :

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटी तून श्री’चे राजबिंडे रूप शिंदेशाही पगडी अवतारातील वैभवी रूप अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी आळंदी मंदिरात परिश्रम पूर्वक साकारले. श्रीचे लक्षवेधी रूप पाहण्यासह व श्रींचे दर्शनास भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली. आवेकर भावे श्रीरामचंद्र संस्थान आळंदीसह परिसरात श्री रामजन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी परंपरेने हरिनाम जयघोषात साजरा झाला. हजेरी मारुती मंदिरात भजन सेवा हि उत्साहात झाली.

माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गुढी पाडव्यापासून श्रीचे समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास सुरुवात होते. रामनवमी निमित्त श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार, पुष्पसजावट करून श्रीचे वैभवी रूप साकारण्यात आले. श्री नर्सिव्ह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात श्रीक्षेत्रापाध्ये श्रीचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी,सुधीर गांधी व गांधी परिवाराने चंदनउटीतून परिश्रम पूर्वक श्रींचे वैभवी रूप साकारले.

दरम्यान आळंदी मंदिरात राम नवमी निमित्त देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त विधितज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर उपव्यवस्थापक तुकाराम माने, ज्ञानेश्वर पोंदे आदीचे उपस्थितीत आणि मार्गदर्शनात धार्मिक कार्यक्रम झाले. आळंदी मंदिरात भाविक, नागरिक, साधक यांनी श्रीचे दर्शनास गर्दी केली. मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थांनच्या प्रथा प्रमाणे मंदिरात राम नवमीचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन केले.

राम नवमी निमित्त माऊली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत रामजन्मोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. यात मंदिरात प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती,चोपदार यांचे वतीने गुढी पूजन झाले. चंदन उटी निमित्त भाविकांना श्रींचे पादुका दर्शन कारंजा मंडपात सुरु होते. उटी नंतर दर्शनास पंखा मंडपात सुरुवात झाली. यानंतर सहाचे सुमारास चंदन उटी दर्शन खुले झाले. श्रीरामजन्मोत्सवा निमित्त श्रीना वैभवी पोशाख करण्यात आला. विना मंडपात मानकरी संतोष मोझे यांचे वतीने शरद महाराज बंड यांची कीर्तन सेवा झाली. जन्मोत्सव कीर्तन-पाळणा, आरती, महानैवेद्य, सुंठवडा प्रसाद वाटप, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, मालक बाळासाहेब पवार, मानकरी, वेदांत चोपदार आदी उपस्थित होते. जन्मोत्सव नंतर श्रीचे दर्शन खुले करण्यात आले. दुपारी अडीच सुमारास श्रीनां वैभवी शिंदेशाही चंदन उटी निमित गाभारा भाविकांना दर्शनास बंद करून कारंजा मंडपात श्रीचे पादुका दर्शन सुरु करण्यात आले.

प्रथेप्रमाणे माऊलींचे संजीवन समाधीवर चंदन उटी तील शिंदेशाही पगडीतील वैभवी राजबिंडे आकर्षक रूप साकारत पूजा बांधली. विविध वस्त्रालंकार,आभूषणे आणि पुष्प सजावट,फलार्पण करीत श्रीचे रूप लक्षवेधी राहिल्याने भाविकांनी आपल्या नेत्रात साठविले. श्रीचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती. नित्यनैमित्तिक प्रवचन सेवा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने झाली. मानकरी यांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद देण्यात आला.

Advertisement

आवेकर-भावे श्री राम मंदिर संस्थांनचे वतीने उत्साहात श्री रामाची पालखी माऊली मंदिर प्रदक्षिणा आणि नगर प्रदक्षिणा झाली. श्री राम पालखीचे मंदिरात स्वागत करून नारळ प्रसाद देण्यात आला. श्रीनां धुपारती झाल्यानंतर रात्री मानकरी संतोष मोझे यांचे वतीने जागर झाला. मंदिरात व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, श्रीचे चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, संजय लवांडे, संजय रणदिवे, महेश गोखले आदींनी मंदिरात विविध विभागात तसेच भाविकांचे दर्शनाचे नियोजन केले. येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात श्रीराम नवमी निमित्त श्री संत गोरोबा काकांचे वंशपरंपरागत पुजारी किशोर दाते, किरण दाते, बल्लाळेश्वर वाघमारे यांनी परिश्रम पूर्वक चंदन उटी अवतार साकार केला. आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत परंपरेने प्रसाद वाटप उत्साहात झाले.

आळंदीत रामजन्मोत्सव उत्साहात साजरा

येथील आवेकर-भावे श्री रामचंद्र संस्थानच्या श्री राम मंदिरात रामजन्मोत्सवास प्रथा परंपरांचे पालन करीत राम नवमी वार्षिक उत्सव साजरा झाला. या निमित्त गुढी पाडवा ते राम नवमी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम नवमी निमित्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्रीराम मंदिरात आकर्षक मोगऱ्याचे फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी श्रींची पूजा,अभिषेक करण्यात आला. श्रीराम मंदिरात भाविकांनी पुष्पवृष्टी करत जन्मोत्सव साजरा केला. भाविकांना श्रींचा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी अनेक भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.श्री राम मंदिरातील श्रींचे जन्मोत्सव सोहळ्याचे यशस्वीते साठी संस्थांचे अध्यक्ष प्रमुख विश्वस्त संजय आवेकर, बिपीन चोभे, सुनील भदे, गजानन काळे, रघुवीर ओक, तन्मय चोभे, नरहरी महाराज चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रामकृष्ण महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विध्यार्थी श्री रामरायांचे पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते. यासाठी अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी विश्वस्त बिपीन चोभे, गणेश गरुड, किरण येळवंडे, नरहरी महाराज चौधरी, लक्ष्मण मेदनकर आदींसह पदाधिकारी मान्यवर, वारकरी भाविक उपस्थित होते. जन्मोत्सवात सर्व नारदीय कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली. यावेळी आजी, माजी विश्वस्त आदी मान्यवर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आळंदी ग्रामस्थ व रामभक्त युवक तरुणांचे वतीने भव्य श्रीरामरायांचे प्रतिमेची शोभायात्रेतून भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. महाद्वारात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे वतीने श्रीमंताची पूजा, पाळणा, नवमी निमित्त लक्षवेधी शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी राम भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यू.अमरज्योत मित्र मंडळाचे वतीने कुऱ्हाडे आळीत श्रीराम जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. महाप्रसादास भाविकांनी गर्दी करून लाभ घेतला. श्री लक्ष्मीनारायण विष्णू मंदिरात देखील श्री राम जन्मोत्सवा निमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आले. येथील ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिर आळंदी येथे आळंदी ग्रामस्थांचे वतीने भजन सेवा रामजन्मोत्सव निमित्त हरिनाम गजरात झाली. माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी यासाठी परिश्रम घेतले. ज्ञानेश्वर जाधव महाराज यांनी सेवा रुजू केली.

मरकळ येथे श्रीगुरुदेवदत्त प्रतिष्ठान तर्फे रामजन्मोत्सव साजरा

मरकळ येथील श्री पंचलिंग श्रीगुदेवदत्त प्रतिष्ठानचे वतीने रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. यात श्रींची पूजा, आरती, अभिषेक, हरिनाम गजरात भजन झाली. श्री पंचलिंग श्रीगुदेवदत्त प्रतिष्ठान प्रमुख विश्वस्त ताई माऊली महाराज यांचे मार्गदर्शना खाली राम जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. श्री केशवराज देवस्थान, मरकळ ग्रामस्थ यांचे वतीने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी वारकरी साधक, विद्यार्थी, मरकळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्याचे रोहिदास कदम यांनी सांगितले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page