*तळेगाव येथे अज्ञात वाहनाचे धडकेने महिलेचा मृत्यू*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागात मंगळवारी (दि.०९)सकाळी ५.१५ वा.सुमारास तळेगाव-चाकण मार्गावर आशा नंदकुमार शिवले (वय ५९) मोहन नगर, इंद्रायणी कॉलनी तळेगाव स्टेशन ता.मावळ या महिलेचा अपघातात मृत्यू झाला.सदर महिला पुणे येथे केईएम हॉस्पिटल येथे कामावर जाण्यासाठी घरातून निघून तळेगाव-चाकण रोडवर स्टेशन चौकाच्या दिशेने इंद्रायणी कॉलेज समोर संत ज्ञानेश्वर शाळेच्या समोरील रोडच्या कडेने पायी जात असता पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालकाने वाहतूकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन महिलेस पाठीमागून धडक देवून अंगावर गाडी घालुन गंभीर जखमी करुन मृत्यूस कारणीभूत होवून पळून गेला.अशी फिर्याद मृत व्यक्तीचे नातलग मयुर आनंद दाभाडे वय-२७ मस्करनीस कॉलनी तळेगाव दाभाडे ता.मावळ यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे दिली.