*सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तालुकास्तरीय स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण संपन्न
मावळ*
सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तालुकास्तरीय स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण दि. १८ जुलै, २०२५-२६ शैक्षणिक वर्ष
पुणे भारत स्काऊट्स आणि गाईड्सव शिक्षण विभाग पंचायत समिती मावळ संयुक्त विद्यमाने स्काऊट गाईड तालुका स्तरीय नोंदणी व उजळणी वर्ग आयोजन तळेगाव येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात आले होते. शाळेच्या पथकातील विद्यार्थ्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत स्काऊट गाईडच्या शिस्तीत व विद्यार्थ्यांनी बनवलेले सुशोभित पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. सरस्वती पूजन आणि बेडन पॉवेल यांचे प्रतिमापूजन, प्रार्थना, प्रास्ताविक यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष सुनील भेगडे व मुख्याध्यापिका रंजीता थंपी यांच्या हस्ते शिल्पाताई रोडगे प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग तळेगाव नगरपालिका,काळे सर, श्री.शेळकंदे(विस्तार अधिकारी, पं. स.श्रीमती अन्सारी मॅडम (विषयतज्ञ, पंचायत समिती)दिगंबर कारंडे, जिल्हा संघटक श्रीमती उषा हिवराळे, जिल्हा संघटक प्रमुख या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी सह्याद्री स्कूल मधील जम्बोरी येथे झालेल्या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक करण्यात आले. विजयकुमार जोरी आणि तारळकर मॅडम यांनी सर्व उपस्थित शिक्षकांची नोंदणी व मार्गदर्शन केले. यशश्री आलम (स्काऊटर सह्याद्री स्कूल) यांच्या मार्गदर्शनाखाली सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी पाटील व दिशा जामदार इ. दहावी यांनी केले. पुणे जिल्हा गटशिक्षण अधिकारी व तालुक्यातील सर्व शाळांमधील स्काऊट गाईड पथकाचे शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. शाळेने केलेले व्यवस्थापन व नियोजन अतिशय उत्कृष्ट असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक भारावून गेले.सेल्फी पॉईंटमध्ये फोटो काढण्याचा आनंद सर्वांनीच घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे आभार माननीय श्री सावंत सर यांनी मानले.






