नूतन महाराष्ट्र अभियंत्रिकीमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी
तळेगाव दाभाडे :
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लोकमान्य टिळक यांची जयंती नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस.एन. संपली, प्रबंधक विजय शिर्के, सुधाकर ढोरे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.
” लोकमान्य बालगंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र चळवळीतील एक महत्वपूर्ण नेते होते. ते एक शिक्षक, संपादक, लेखक आणि वकील होते. सार्वजनिक गणेशोस्तव हा टिळकांनी महाराष्ट्रात सुरु केला,” अशी माहिती प्राचार्य डॉ. एस.एन. संपली यांनी बोलताना दिली .
“लोकमान्य टिळक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या ऐतिहासिक वारसा असलेल्या पावन भूमी मध्ये आपण कार्य करत आहोत हे आपले भाग्य आहे,” असे उद्गार अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार यांनी बोलताना काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शिर्के यांनी केले तर आभार सुधाकर ढोरे यांनी व्यक्त केले.






