रमजान ईदची जय्यत तयारी. मस्जिदी, ईदगाहवर अदा होणार नमाज
तळेगाव दाभाडे :
तळेगाव स्टेशन येथील मुस्लिम जमात ट्रस्ट मस्जिदमध्ये तर मौलाना सिकंदर-ए-आजम यांनी गाव भागातील जमा मस्जिदमध्ये सार्वजनिक दुआ केली.
दरम्यान, ईदच्या दिवशी होणारी गर्दी पाहाता, स्टेशन मस्जिद येथे ईदची नमाज दोन सत्रात होणार आहे. पहिली नमाज सकाळी 8.15 वाजता तर दुसरी सकाळी 9 वाजता होणार असल्याचे मुख्य विश्वस्त अय्युब सिकिलकर यांनी जाहीर केले. राहादरीस अडथळा होऊ नये म्हणून नगर परिषद पीएम श्री संत ज्ञानेश्वर शाळेच्या (गुलाबी शाळा) प्रांगणात वाहन पार्किंगची सोया किलो असून प्रत्येकाने आपापले वाहन याच ठिकाणी रांगेत शिस्तबद्धरित्या उभे करण्याचे आवाहन तसेच रमजान ईद साजरी करण्याबाबत उपस्थितांना ईद संयोजन समितीप्रमुख नदीम शेख यांनी मार्गदर्शन केले.
गावभागतील ईदगाह मैदानावर सकाळी 9 वाजता सामूहिक नमाज अदा करण्याचे नियोजन केले असल्याचे ट्रस्टी रशीद सिकिलकर यांनी सांगितले. येत्या 31 मार्च रोजी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी(1 एप्रिल) रमजान ईद शहरात साजरी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे.
तीनचार दिवसांनी सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे आणि पंचक्रोशीतील मस्जिदीमध्ये आणि ईदगाहवर ईद-उल-फित्रची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम ट्रस्टतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठी नववर्ष, गुढीपाडवा आणि ईद सर्व जातीधर्मीयांनी आपुलकीने साजरी करावी, असे आवाहन ट्रस्ट प्रमुखांनी केले आहे.
गुरुवारी(दि.27) शब-ए-कद्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (स. स.) यांच्यावर परमेश्वराची (अल्लाहची) कृपामर्जी झाल्यानंतर 1450 वर्षांपूर्वी याच रात्री पवित्र कुरआन ग्रंथ परिपूर्ण अवतरला. तमाम मानवजातीला शांतता आणि मानवतेचा जीवन संदेश प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दिला. त्या स्मृतींना उजाळा देत अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताप्रति कृतज्ञाता व्यक्त करत मुस्लिम बांधवांनी तरावीहची नमाज पूर्ण केली. त्यानंतर तमाम मानवजातीस प्रेषितांनी सांगितलेल्या मार्गाने जगण्याची सद्बुद्धी देणाची अल्लाहकडे दुआ मागितली.मौलाना शाहिद सिकिलकर यांनी