पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत नोंदणी करण्यासाठी पीसीसीओईमध्ये नोंदणी शिबिराचे आयोजन

SHARE NOW

पिंपरी, पुणे (दि. १० फेब्रुवारी २०२५) पीसीसीओईमध्ये भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे “पंतप्रधान इंटर्नशिप योजना” संबंधित माहितीसत्र व ऑनलाईन नोंदणी शिबिराचे मंगळवारी (दि. ११ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले आहे त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी केले आहे.

    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) येथील सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयसीएलएस विभागाचे अधिकारी उपस्थित राहून या योजनेची माहिती देणार आहेत. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची व गेल्या तीन वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या योजनेत ऑनलाईन नोंदणी देखील करून घेण्यात येणार आहे.

  “पंतप्रधान इंटर्नशिप योजना” ही भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत २१ ते २४ वयोगटातील तरुणांना देशातील सुमारे ५०० अग्रगण्य कंपन्यांमध्ये सुमारे एक कोटी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार असून दरमहा शिष्यवृत्ती मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांना उद्योग क्षेत्रात लागणाऱ्या कौशल्यांनी सुसज्य करून नोकरीसाठी तयार करणे व त्यांच्या करिअरला चालना देणे हा आहे.

Advertisement

अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच विज्ञान, कला, वाणिज्य, बीसीए, बीसीएस, व्यवस्थापनशास्त्र या शाखेतील (उत्तीर्ण झालेले किंवा अंतिम वर्षातील) पदवीधर, पदविकाधारक (डिप्लोमा), आयटीआय, बारावी उत्तीर्ण, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या माहितीसत्रात सहभागी होऊन “पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा” लाभ घ्यावा असे आवाहन पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी केले आहे. सहभागी होण्याकरिता खालील लिंक वर रजिस्ट्रेशन करावे :

https://tinyurl.com/PMinternship22

या कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page